चांगले आयुष्य जगण्यासाठी या 7 गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात - 7 Must have skills for good life

 

नमस्कार मित्रांनो

आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे 7 must have skills.

अशा गोष्टी ज्या तुम्हाला चांगले आयुष्य जगण्यासाठी माहित असायलाच हव्यात.

1.     Cooking skill-
आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? पण मित्रांनो विचार करा तुम्ही आज घरी राहत असाल आणि उद्या तुम्हाला नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहावं लागणार असेल तर किमान स्वतःचे पोट भरेल इतके जेवण तरी आपल्याला बनवता आले पाहिजे.


2.       Organization skill-
हेही तितकंच महत्त्वाचं आहे. नीटनेटकेपणा आपल्या आयुष्याला खूप चांगलं वळण देऊन जातो. आपल्या व्यक्तिमत्त्वाची लोकांवर खूप चांगली छाप पडते.



3.       Fiancial skills -आर्थिक व्यवहारकौशल्य-  तुमचं कालचं आयुष्य जसे होते तसेच उद्या असेल असं नाही त्यामुळे आपल्या आर्थिक व्यवहाराबाबत जागरूक असणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

4.     Internet surfing-   इंटरनेट सर्फिंग तर सगळ्यांना येते पण आपण एक गोष्ट सर्च करताना बाकीच्या गरज नसलेल्या गोष्टीही बघत बसतो आणि आपला वेळ वाया घालवतो. त्यामुळे अचूक गोष्टी सर्च करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

5.     वाचन-
  
ही अजून एक सामान्य गोष्ट पण हीच गोष्ट तुमची प्रतिभा असामान्य करून जाते. मित्रांनो ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी एका दिवसात किंवा एका वर्षात मिळत नाही त्यासाठी नवनवीन गोष्टी शिकत राहणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी रोजच्या आयुष्यातला ठराविक वेळ देणं गरजेचं आहे.


6.     भावनांवर नियंत्रण-
आता तुम्ही म्हणाल की भावना तर नैसर्गिक असतात. पण यशस्वी लोक त्यांच्या भावना नियंत्रित ठेवतात म्हणून यशस्वी असतात.

7.     निर्णयकौशल्य-
 आपल्या  चांगल्या आणि वाईट निर्णयांचा परिणाम थेट आपल्या आयुष्यावर होत असतो. खुपदा असंही होतं की निर्णय घेताना आपण गोंधळलेले असतो.अशा वेळी निर्णय कौशल्य कामी येते हे तुम्ही जितक्या लवकर शिकाल तितके मोठे व्हाल. 

Comments