शिफ्टिंग म्हणजेच एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित होणे. पण खूप वेळा हे काम तितकंच किचकट होऊ शकतं. Specially बायकांसाठी कारण घर शिफ्ट केल्यावर सगळ्यात आधी गरजेच्या वस्तू वेळेवर सापडत नाहीत त्यामुळे शिफ्टिंग एक प्रोसेस न होता वैताग होऊन बसतो.
चला तर मग इथे मी काही टिप्स शेअर करत आहे. I hope या टिप्स तुम्हाला
नक्की मदत करतील.
1.
सगळ्यात आधी तुमच्याकडे शिफ्टिंग साठी किती दिवस शिल्लक आहेत
हे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे आधीच प्लॅनिंग करा.
2.
तुमच्याकडे किती सामान आहे त्याची एकदा लिस्ट करा. याचा फायदा असा की
एकदा सामानाचा अंदाज आला की त्याप्रमाणे बॉक्सेस,टेप, tie hooks असं पॅकिंग सामान निवडायला आणि वाहन निवडायला मदत होते.
3.
आता सामानाची लिस्ट करताना त्याची वर्गवारी करा. जसे की किचन मधील वस्तू, आवश्यक कागदपत्रे, फर्निचर, कपडे, मौल्यवान वस्तू, मुलांचे सामान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु असे.
4.
यात तुम्ही आणखी एका प्रकारे लिस्ट करू शकता ते म्हणजे जागे नुसार
जसे की हॉल मधील सामान, बेडरूम मधील सामान असे.
5.
सामानाची list तयार झाली की त्याप्रमाणे अगोदरच वाहन book kara.
6.
एकदा लिस्ट करून झाली की त्याप्रमाणे बॉक्स भरायला सुरवात करा.
7.
सगळ्यात आधी ज्या
वस्तु रोज वापरात नाही त्या पॅक करा.
8.
काचेच्या वस्तू bubble
wrap मध्ये pack करा.
9.
आणि प्रत्येक बॉक्स वर marker pen किंवा स्केच pen ने लिहून ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे कारण याने वस्तू वेळेत सापडतील
आणि तुमचा गोंधळ उडणार नाही.
10.
आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे तुमच्या मौल्यवान वस्तू शक्यतो
तुमच्या बरोबर असू द्या पण तसं करणे शक्य नसेल तर अश्या बॅग मध्ये ठेवा ज्याला व्यवस्थित
लॉक लागेल.
11.
आता सर्वात महत्त्वाची टीप मोह टाळा.खुपदा आपण निकामी झालेल्या वस्तू कधीतरी उपयोगात येतील अश्या आशेने जपून ठेवतो पण हीच ती वेळ असते जेव्हा आपण घरातला कचरा कमी करू शकतो.
12.
जे शक्य असेल ते कुणा गरजू लोकांना donate करा अन्यथा त्याची
योग्य ती विल्हेवाट लावा.
13.
वरील टिप्स प्रमाणे बॉक्स भरून झाले की त्या बॉक्सेस ची संख्या
मोजून घ्या आणि त्याप्रमाणे वाहन ठरवा. जर तुम्ही अश्या ठिकाणी प्रवास करत असाल जिथे परवानगी ची गरज
आहे तर तशी कागदपत्रे आधीच तयार ठेवा.
14.
लांबच्या प्रवासासाठी ड्रायवर चा contact नंबर आणि किमान driving
license ची कॉपी तुमच्याकडे असू द्या.
15.
समान उतरवताना परत बॉक्सेस ची संख्या मोजून घ्या.


Comments
Post a Comment