स्त्रियांची आर्थिक साक्षरता

स्त्रियांची आर्थिक साक्षरता

आजच्या आयुष्यात आपण कितीतरी कामे एकाच वेळी करतो यालाच multitasking म्हणतात. पण बायकांसाठी हा विषय वेगळा नाही. नोकरी, घर, मुलं,नाती असं सगळं स्त्री हिरीरीने सांभाळताना दिसते

पण असे काही मुद्दे जरूर आहेत ज्यावर बोलण्याची गरज आहे.

ते म्हणजे स्त्रियांची आर्थिक साक्षरता.



आजची स्त्री सुशिक्षित आहे पण आर्थिक दृष्ट्या प्रशिक्षित नाही.

अर्थ व्यवहारातील प्रक्रिया बोटांवर मोजण्या इतक्याच स्त्रियांना ठाऊक असते. आपल्या आजुबाजूला नजर फिरवली की लक्षात येईल किती सहजरीत्या स्त्रिया अर्थिक व्यवहारातून वगळलेल्या दिसतात. हे जाणून बुजून होत नसलं तरीही मोठ्या प्रमाणात घडताना दिसेल.

कित्येक  सुशिक्षित गृहिणींना घरातील आर्थिक व्यवहारांची पुसटशी कल्पना नसते.

घरात येणारा पैसा कुठे गुंतवला जातो, कर्जाचे हफ्ते, व्याजाची गणितंविमा पॉलिसी आणि त्याचे नियम, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि इतर बँकेतील महत्त्वाचे व्यवहार या बाबतची माहिती कित्येक स्त्रियांना नसते.

स्वावलंबी किंवा स्वतः पायांवर उभ्या असणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतही थोड्या फरकाने हेच चित्र दिसतं.

बर्‍याच स्त्रिया आजही अर्थ व्यवहार घरातील कुणा पुरुष मंडळींवर सोपवताना दिसतात.

स्त्री स्वतः जरी कमवत असली तरीही या बाबतीत मात्र ती परावलंबित्व स्विकारताना दिसते.

अपवाद वगळता खूप अंशी स्त्रिया कुठल्या ना कुठल्या कारणाने असं करताना दिसतात.

 

पण या सगळ्याचे मूळ शोधले तर कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता, अंगी व्यवस्थापन गुण असतानाही अर्थ व्यवहाराबाबत असलेली उदासीनता, बायकांना पैसा हाताळता येत नाही अशी बुरसट समजूत, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कुठे व्यवहारात चूक झाली तर प्रोत्साहन देणार्‍या लोकांची कमतरता ही सगळी कारणं समोर येतात.

ह्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या घरातील स्त्रियांना घरातील प्रत्येक आर्थिक व्यवहारांच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.

 

संदर्भ

https://www.thehindu.com/opinion/open-page/women-and-financial-literacy/article32990046.ece

Comments