इन्व्हेस्टमेंट सुरू करताय? मग हे नक्की वाचा.. things to know before investing

योग्य गुंतवणूक- Correct Investment

आजकाल प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय.

पैशाने पैसा कसा वाढवायचा, श्रीमंत होण्याचा यशस्वी मार्ग वगैरे वगैरे.  Mutual fund, share market याविषयी बरच बोललं जातं. मोठमोठ्या उद्योगपतींच्या यशाची कथा ऐकवली जाते. अदानी, अंबानी, दमानी आणि वॉरेन बफे सारख्या उद्योगपतीचे नाव तर हमखास घेतलं जातं.


ऑनलाईन जगतात एखाद्या गोष्टीचा भडीमार केला की माहिती आणि अचूक माहिती यातला फरक कळणे अवघड होते आणि याच फरक माहीत नसल्यामुळे आर्थिक बाबतीत नुकसान होण्याचा धोका असतो.

त्यामुळे मी फक्त काही निकष सांगणार आहे ज्याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे.

1.     ज्या व्यक्तीचा सल्ला आपण ऐकतोय त्याचा financial sectors चा अनुभव आहे का? आणि असेल तर  तो नेमका कसा आहे.

2.     पैसा वाढवण्यासाठी जोखीम पत्करावी लागते. हे सगळेच सांगतात परंतु नेमकी किती जोखीम घ्यायची याचं अचूक मार्गदर्शन समोरची व्यक्ति करते का?

3.     सल्ला देणाऱ्याचा काही वैयक्तिक हेतू तर नाही ना. कारण बर्‍याचदा असं होतं की काही सल्लागार मंडळी सल्ला घेणाऱ्याला घाबरवून सोडतात आणि मग त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थाच कशा योग्य आहे हे सांगून ग्राहक मिळवतात (फसवतात).

4.    मुळात कुठलीही गोष्ट आपल्याला मोफत मिळालेली नसते आपण आपला वेळ खर्च केलेलाच असतो हे कायम लक्षात ठेवा.

5. कधीही कुठल्याही एकाच सल्लागार संस्थेवर/व्यक्तीवर अवलंबून राहू नका. मिळालेल्या माहितीची पडताळणी करा जेणेकरून त्यात किती तथ्य आहे हे कळेल.

6.   खरा सल्लागार गोष्टी क्लिष्ट करण्यापेक्षा सोप्या करून सांगतो.

ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि योग्य सल्लागार निवडा त्यासाठी वेळ द्या हीच सगळ्यात योग्य इन्व्हेस्टमेंट आहे.

Comments