भावना- Feelings

भावना - किती छोटा शब्द आहे हा.

पण आयुष्यातला सगळ्यात किचकट गुंता या छोट्या शब्दामुळेच होतो.

त्याहीपेक्षा अवघड प्रश्न आहे भावना जपणे.



कित्येकदा आयुष्यात असा पेच पडतो की एकाच वेळी कुणाला आपल्या वागण्यामुळे आनंद होणार असतो तर त्याचवेळी कुणाला दुःख होणार असते. आपला हेतू कुणालाही दुखावण्याचा नसतो पण तरीही आयुष्यात असे प्रसंग येतातच.

अशावेळी काय करायचं तेच कळत नाही. मग सुरू होते तारेवरची कसरत, कधी लपवाछपवी,कधी खोटं बोलणं, तर कधी मन मारून जगणं. त्या विशिष्ट व्यक्तिसमोर एक वेगळाच देखावाउभा करणं

ह्याने त्या व्यक्तीच्या/ व्यक्तींच्या मनात आपलं स्थान निर्माण झालं तरीही  वैयक्तिक पातळीवर मात्र आपण खरेपणा गमावून बसलेलो असतो.

आणि असंच आयुष्य जगत राहिलं की काही दिवसांनी आपल्यालाच कळून चुकते की आपण सदासर्वकाळ सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही.

हे सत्य पचवण्यासाठी जितका वेळ जातो तितका वेळ भावनांच्या गुंत्यातून सुटका नाही हेच खरं .

हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

Comments