confusion- द्विधा मनस्थिती


खुपदा काही गोष्टी ठरवण्यात गोंधळ होतो.

नेमकं काय बरोबर काय चूक हे कळत नाही.

योग्य निर्णय घेण्याची किंवा घेतलेला निर्णय योग्य ठरविण्याची इतकी धडपड असते की या सगळ्यात एखादी गोष्ट मनाप्रमाणे होऊनही तिचा आनंद घेता येत नाही.

कधी कधी निर्णयामागे घेतलेल्या कष्टांमुळे थकायला होतं तर कधी त्या निर्णयामुळे आजूबाजूच्या  लोकांवर काय परिणाम होतील किंवा लोक काय म्हणतील हा विचार करून करून थकायला होतं.

कधी कुणाला दुखवायचं नसतं तर कधी कुणाला आपल्या मर्जीविरुद्ध आनंदी ठेवायचं असतं. कधी कुणाला आपल्या वागण्यामुळे त्रास होऊ नये म्हणून खोटं बोलायचं असतं तर कधी कुणाच्या प्रश्नांचा भडीमार नको म्हणून वाचायचं असतं.

कधी कुणासमोर झुकतं माप घ्यायचं नसतं तर कधी इच्छा नसताना कुणासमोर शरण जावं लागतं.

कधी राग व्यक्त करायचा असूनही करता येत नाही तर कधी नको असताना नको त्या व्यक्तीवर, वस्तूवर,परिस्थितीवर राग निघून जातो.

 

सतत कुठली तरी भिती पाठलाग करत असते. आपण काही चूक तर करत नाही ना? आपण खूप चुकीचं वागत नाही ना? आपल्या वागण्यामुळे लोकांना काय वाटत असेल? आपण फार स्वार्थी झालोय का? आयुष्य किती छोटं आहे ते नीट जगणं आपल्याला जमेल का? आपल्या आयुष्यात काही चांगलं घडण्याची वेळ निघून गेलीय का? आपण खूप घाई करतोय का? आपण आत्मविश्वास हरवुन बसलोय का?  लोकांच्या नजरेत आपली किंमत आहे का? सर्वात महत्त्वाचं आपल्या नजरेत आपली किंमत आहे का?

असे हजार प्रश्न आणि त्यात एकाही गोष्टीचं समाधानकारक उत्तर नसते.

थोडक्यात काय तर द्विधा मनस्थितीत जे हवं ते वागता येत नाही आणि जे नको तेच वागायला आयुष्य भाग पाडतं.

 मनमुराद जगण्याचा आनंदच घेता येत नाही.

तुमच्या आयुष्यात असे प्रसंग आले आहेत का? असतील तर नक्की शेअर करा. आणि हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

 image source: internet

Comments