आयुष्यात
कितीतरी गोष्टी आपण उद्यावर ढकलतो.
आजकाल
त्याला procrastination म्हणतात
काही
जणांना गोष्टी लगेच करायच्या असतात अगदी त्याच क्षणी अन काहींना आरामात उद्या परवा
अशी जीवनशैली आवडत असते
पण मी असं म्हणेन की चालढकल काही बाबतीत योग्य आहे
तर???
आता तुम्ही म्हणाल मी कुठल्या बाबतीत बोलतेय?
तर चालढकल कामी येते ती भांडणात.
कसं
असतं भांडण म्हंटलं की स्वतः ला सिद्ध करणं ओघाने आलंच पण प्रत्येक वेळी प्रत्येक
वाद तडीस नेला पाहिजे असं नाही.
अशावेळी
आज राहु दे उरलेलं भांडण उद्या करु असं आपण म्हणतो का?
तर नाही आपल्याला त्याच वेळी सगळं बोलायचंच असतं.
पण जेव्हा आपण उद्या बोलू असं म्हणतो तेव्हा आपल्याला शांत होण्यासाठी आणि
समोरच्याची बाजू समजून घेण्यासाठी वेळ मिळतो.
कदाचित
रागाच्या भरात आपण काही खोचक बोलणार असू तर तेही टाळता येतं.
एका अर्थान भांडण रोखण्यासाठी हा फॉर्म्युला चांगला नाही
का?
आता हा लेख वाचून तुम्हाला माझ्याशी तत्काळ वाद घालण्याची
इच्छा होत असेल तर यावर आपण उद्या बोलू??
Comments
Post a Comment